शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर, पुण्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत; एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 22:05 IST

राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली. अटक केलेल्या वैभव राऊत (वय -40), शरद कळसकर (वय - 25)आणि सुधन्वा गोंधळेकरने (वय - 39) घातपाताचा कट रचल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. सुधन्वाच्या चौकशीनंतर आज एटीएसने सोलापूर आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात शस्ञसाठा हस्तगत केला आहे.स्फोटांप्रकरणी एटीएसने शुक्रवारी वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर यांना अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत पोलिसांनी 16 ते 18 जणांची याप्रकरणी चौकशी केली आहे. यातील आरोपी गोंधळेकरच्या चौकशीनंतर १० गावठी पिस्तुले, १ गावठी कट्टा, १ एअर गन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझिन, ३ अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेट्स, १ ट्रिगर मॅगझिन, १ चॉपर आणि १ स्टील चाकू आदी साहित्य जप्त केले आहे. याशिवाय अर्धवट तयार शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हॅंड ग्लोज, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटांबाबत हॅंडबुक, एक्‍प्लोसीव्ह व मोबाईल प्रींटआऊट, रिले स्वीच सर्कीट ड्रॉईग पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड आदी साहित्यही जप्त केले आहे. याप्रकरणी राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिस