शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

भर कोर्टात आरोपीने मारली मयत भावाच्या बहिणीच्या कानफटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 9:43 PM

दावडी येथे एक वर्षांपूर्वी चालत्या बसमध्ये भावाचा कोयत्याने खुन करण्यात आला होता ..

राजगुरुनगर : दावडी येथे एक वर्षांपूर्वी चालत्या बसमध्ये भावाचा कोयत्याने खुन करणाऱ्या आरोपीने भर कोर्टात मयत भावाच्या बहिणीच्या कानफाटात चापट मारून शिवीगाळ केली असल्याची आज (दि. ७ )घटना राजगुरुनगर येथील जिल्हा कोर्टात घडली आहे. याबाबत पिडित मुलीने खेडपोलिस ठाण्यात तक्रार दिली आली आहे.मागील वर्षी १२ जून २०१८ रोजी तुझ्या बहिणीचे माझ्याशी लग्न का लावून देत नाही या कारणावरुन राग मनात धरुन चिडून जाऊन बहिणीचा भाऊ श्रीनाथ सुदाम खेसे (वय१८ )रा. खेसे वस्ती, दावडी यांच्या आरोपी अजित भगवान कान्हुरकर ( रा. कान्हुरकरमळा, दावडी ) यांने चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने डोक्यावर मानेवर सपासप वार करून खुन केला असल्याची खळबळजनक घटना दावडी ( ता. खेड ) घडली होती. या घटनेनंतर आरोपी जेलमध्ये होता. खुन झालेल्या भावाची बहीण राजगुरुनगर येथील न्यायालयात (दि. ७) साक्ष देण्यासाठी शनिवारी आली होती.आरोपी अजित कान्हुरकर यांने त्याच्या मोबाईलवरून पीडित तरुणीचे स्वत:चे व्हॉटस अ‍ॅपवरुन नातेवाईक व मित्र मैत्रिणी यांना फेसबुक व व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर वेगवेगळे फोटो सोबत अश्लील फोटो व  मेसेज पाठवून बदनामी केली. व्हॉट्सअप व फेसबुकवरून बदनामी केल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये पीडित मुलगी व घरातील भाऊ, आई वडील यांनी याबाबत फिर्याद दिली होती. याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पीडित मुलीचा आरोपी अजित हा सख्या आत्याचा मुलगा आहे. हे सर्व दावडी गावातच राहतात. दरम्यान २०१८ मध्ये काही महिन्यापासुन मुलीला आरोपी हा वारंवार त्रास देत होता. तु माझ्याशी लग्न कर या कारणांवरून तिला दमदाटी करून तिचा विनयभंग करत असे याबाबत पिडित मुलीने खेड पोलिस स्टेशनमध्ये आरोपी आजित यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी यांची कुठलीही दखल घेतली नाही.  आरोपी अजितने तुमच्या मुलीचे लग्न माज्याशी लावून द्या, असे पिडित मुलीच्या कुंटुबांला सांगितले माझे सोबत लग्न लावून नाही दिले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी आरोपीने दिली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रीनाथ, बहिण हे दोघे जण राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविदयालयात जाण्यासाठी (गोलेगाव ता. खेड ) येथे मुक्कामी असलेली राजगुरुनगर डेपोची एसटी बसची वाट पाहत खेसे वस्ती येथे थांबले होते. बस आल्यानंतर श्रीनाथ व बहिन हे दोघे जण बसमध्ये बसले होते.एसटी १ किलोमीटर अंतरावर गेली.आरोपी  हा आधीच निमगाव खंडोबा येथील बसचे तिकीट काढून बसमध्ये बसला होता. दरम्यान आरोपीने पाठीमागच्या सीटवरुन उठून एसटी धावत असतानाच त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतुन लोखंडी कोयता काढून मयत श्रीनाथ बेसावध असताना डोक्यावर, मानेवर कोयत्यांने सपासप वार खुन केला होता.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCourtन्यायालय