शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथील कारागृहातून पळालेल्या आरोपीची अहमदनगर जिल्हयात हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 12:51 IST

गावातील जुन्या भांडणावरून आरोपीचा गावातील काही लोकांबरोबर वाद झाला. वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

ठळक मुद्देतीन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल

राजगुरूनगर: खून, मारहाण, दरोडे अशा गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मागील महिन्यात राजगुरुनगर कारागृहातून फरार झाला होता. या आरोपीची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे  बुधवारी रात्री हत्या करण्यात आली आहे.जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गोयकर असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथे राहणाऱ्या गोयकरवर नगरसह पुणे जिल्ह्यात शेकडो गुन्हे दाखल होते. खून, मारहाण, दरोडे अशा गंभीर स्वरुपाचे ते गुन्हे होते. मागील महिन्यात तो राजगुरुनगर येथील कारागृहातून फरार झाला होता. बुधवारी रात्री १० वाजता गावातील जुन्या भांडणावरून राहुलचा गावातील काही लोकांबरोबर वाद झाला. वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यात काही जणांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या करण्यात आली, असे समजते. राहुलची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह राहुलचा असल्याची खात्री केली. या हत्येप्रकरणी भाऊसाहेब बबन खंडेकर, बबन किसन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी, आणि तीन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जणांचा तपास केला जात आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून