The accused was sitting in the car for 2 hours; Fight not to appear on CCTV | २ तास गाडीतच बसून होता आरोपी; सीसीटीव्हीत न दिसण्यासाठी लढवली 'ही' शक्कल  

२ तास गाडीतच बसून होता आरोपी; सीसीटीव्हीत न दिसण्यासाठी लढवली 'ही' शक्कल  

ठळक मुद्देएटीएस देखील याबाबत तपास करत असून अद्याप कोणतीही शक्यता आम्ही वर्तवलेले नाही असे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी लोकमतला सांगितले.

काल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती.  याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० (ब) आणि एक्सप्लोसिव्ह सबस्टेन्स ऍक्ट १९०८ कलम ४अन्वये गुन्हा दाखल आहे. कार उभी केल्यानंतर आरोपी सुमारे दोन तास गाडीतच बसून राहिला होता. यानंतर तो गाडीच्या मागच्या दरवाजाने झुकत झुकत उतरला. जेणेकरुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार नाही. ओळख पटू नये यासाठी त्याने आपला संपूर्ण चेहरा हुडीच्या कॅपने झाकला होता, सोबतच मास्कही लावला होता. असे दृश्य पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीची ओळख पटवणं थोडं अवघड झालं आहे, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. एटीएस देखील याप्रकरणी तपास करत असून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि गुन्हे शाखा समांतर तपास करत आहेत.

मुकेश अंबाना यांच्या घराबाहेर आढळलेली स्कॉर्पिओ कार विक्रोळी येथून आठवडभारपूर्वी चोरी झाली होती. याबाबत चोरीची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात  दाखल आहे. या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांनी १७ फेब्रुवारी स्टिअरिंग लॉक झाल्याने स्कॉर्पिओ ऐरोली एक्स्प्रेस हायवेवर पार्क केली आणि पुढचा प्रवास केला. मात्र, आपली गाडी पार्क केलेल्या जागी नसल्याने त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात गाडी चोरीला गेल्याबाबत तक्रार दाखल केली, अशी माहिती समोर येत आहे. 

मुंबई पोलिसांची १० टीम तयार करण्यात आल्या आहेत. एक टीम परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासणार आहेत. तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयाती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासणार आहे. एक टीम क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपासणार आहे. चौथी टीम आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती गोळा कर्टनर आहे. तसेच एक टीम संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे.

गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांची १० पथकं तयार करण्यात आली आहेत. एक पथक परिसरातील सर्व सीसीटीव्हींच्या आधारे तपास करत आहे. तर दुसरे पथक वाहतूक मुख्यालयातील कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे. अन्य एक पथक क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपासणार आहे. चौथ्या पथकाला आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवण्याचं काम देण्यात आलं आहे. तर एक तुकडी संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे. 

एटीएस देखील याबाबत तपास करत असून अद्याप कोणतीही शक्यता आम्ही वर्तवलेले नाही असे एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी लोकमतला सांगितले. मात्र, या प्रकरणात दहशतवादी कनेक्शन नसून खलिस्तानी कमांडोंचा हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  इंडियन मुजाहिद्दीनच्या एका हस्तकाने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारे एक पत्र पाठवलं होतं. या पत्रामध्ये अंबानी कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Web Title: The accused was sitting in the car for 2 hours; Fight not to appear on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.