शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

१० किलो गांजा, ८० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 18:00 IST

Dacoity Case : शांतीनगर पोलिसांकडून तीन गुन्ह्यांची उकल

ठळक मुद्दे शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरील थैलीत दोन पॅकेट मध्ये २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचा १० किलो ३९० ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण २ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नितिन पंडीतभिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कृत्य होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली एकूण तीन गुन्ह्यांची उकल करीत दहा किलो गांजा, एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसांसह चोरीस गेलेला ८० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळविले असल्याची माहिती बुधवारी शांतीनगर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.       

पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत आमपाडा शानदार मार्केट येथे सोहेल शेख नामक व्यक्ती आपल्या साथीदारासह गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरील थैलीत दोन पॅकेट मध्ये २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचा १० किलो ३९० ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण २ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.            

दुसऱ्या गुन्ह्यात टेमघर येथील गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांनी सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या जवळील ९० ग्रॅम वजनाचे दागिने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी उभी करून ठेवली असता आरोपी अनिल पाल याने सदर दुचाकी चोरी केली होती. या बाबत २ लाख १५ हजार रुपयाच्या चोरी बाबत गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती मिळवून रांची रा.झारखंड येथून आरोपीस ताब्यात घेऊन ८० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.               

तर तिसऱ्या गुन्ह्यात शांतीनगर भाजीमार्केट येथील मन्नत गोल्ड या सोने विक्री च्या दुकानात रात्री साडेनऊ वाजताच्या चांदीची अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने आलेल्या ग्राहकाने दुकानदार अंगठी दाखवीत असताना आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर दुकानदाराच्या गळ्याला लावून त्या कडील सर्व दागिने चोरीचा प्रयत्न केला असता या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस शिपाई श्रीकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस निशस्त्र करून आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात यश मिळविले आहे . पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत ,पो निरीक्षक किरणकुमार काबाडी ,नितीन पाटील ,विक्रम मोहिते यांच्या नेतृत्वखाली पो उप निरी रवींद्र पाटील,निलेश जाधव,बडगिरे ,पोलीस पथकातील शेळके ,चौधरी,वडे, इथापे, सैय्यद, वेताळ,काकड,मोहिते, जाधव,श्रीकांत पाटील ,इंगळे,पाटील,सानप या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाBhiwandiभिवंडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक