६० वर्षाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; पीडितेला १ लाख भरपाई 

By पूनम अपराज | Published: February 4, 2021 03:25 PM2021-02-04T15:25:58+5:302021-02-04T15:29:38+5:30

Kidnap and Rape :त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि लोखंडी रॉडने तिला मारहाण केली, असे सांगण्यात आले.

Accused sentenced to life in prison for abducting and raping 60-year-old woman | ६० वर्षाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; पीडितेला १ लाख भरपाई 

६० वर्षाच्या महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप; पीडितेला १ लाख भरपाई 

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचे  न्यायाधीश डी. आर. भट्ट यांनी आरोपी किरीट बरोट याला दोषी ठरवले आणि त्या महिलेला भरपाई म्हणून 1 लाख देण्याचे आदेश दिले.

गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील कोर्टाने मंगळवारी एका 60 वर्षीय महिलेचे अपहरण आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचे  न्यायाधीश डी. आर. भट्ट यांनी आरोपी किरीट बरोट याला दोषी ठरवले आणि त्या महिलेला भरपाई म्हणून 1 लाख देण्याचे आदेश दिले.

बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल आणि चोरीच्या उद्धेशाने दुखापत केल्याबद्दल कोर्टाने आरोपींना भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या. किरीट बरोट यांनाही अपहरण आणि धमकीप्रकरणी पाच आणि दोन वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील, असे सरकारी वकील प्रेम तिवारी यांनी सांगितले.

बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 


गांधीनगर येथील आरोपीने 25 ऑक्टोबर 2018 रोजी एका महिला मंदिरात दर्शन घेऊन खेडा येथे घरी परत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर थांबली असताना 25 ऑक्टोबर 2018 रोजी त्या महिलेला गाडीमध्ये लिफ्टची ऑफर दिली होती. फिर्यादीनुसार, बरोटने महिलेला साडीने बांधले आणि तिला एका शेतात नेले. जेथे त्याने तिला संपूर्ण रात्र ठेवले आणि व सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या. तसेच त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि लोखंडी रॉडने तिला मारहाण केली, असे सांगण्यात आले.

Web Title: Accused sentenced to life in prison for abducting and raping 60-year-old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.