शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा थरार... मित्राचा खून करुन आरोपी चाकूसह पोलीस ठाण्यात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 11:16 IST

पुण्यातील आर सी एम गुजराथी शाळेसमोरील घटना 

ठळक मुद्देयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती

पुणे : कचरा वेचकांमध्ये चेष्टा मस्करीत झालेल्या भांडणाच्या वादातून तरुणाने चाकूने आपल्या मित्रावर वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर सी एम गुजराथी शाळेसमोरील फुटपाथवर आज सकाळी हा प्रकार घडला. चेतन पाटील असे आरोपीचे नाव असून फरासखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्याचा राग पाटील याच्या मनात होता. आज सकाळी ते कचरा गोळा करण्यासाठी पुन्हा आर सी एम गुजराथी शाळेसमोर आले होते. येथील फुटपाथवर त्यांच्यावर पुन्हा वाद झाला. त्यावेळी पाटील याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर तो स्वत:च रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस चौकीत पोहचला. चाकूसह आलेल्या आरोपीला पाहून पोलिसांची धांदल उडाली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक मृतदेह पडलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस