शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड हत्याकांड प्रकरण: हत्येनंतर मनोज 'तिचे' रोज तुकडे करत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:26 IST

"कहर म्हणजे हत्येनंतर तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करत होता..."

जितेंद्र कालेकर -ठाणे : गेल्या दहा वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्या बरोबर एकत्रित राहणाऱ्या मनोज साहनी (५६) याने  तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याहूनही कहर म्हणजे हत्येनंतर तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करत होता, अशी माहिती नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दिली. अशा क्रूरकर्म्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर ठाणे न्यायालयाने १६ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत.

बोरीवलीमध्ये शीधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. याच ओळखीतून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तिला आई वडिल कोणीच नाही. तर त्यालाही आई वडिल नाहीत. त्याच्या रेशनिंग दुकानावर येण्यामुळेच त्यांच्यातील संबंध वाढत गेली. दहा वर्षांपासून ते एकत्र वास्तव्याला असले तरी त्यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे होतच होती. याच भांडणातून त्याने तिची ४ जूनला हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो तिचे रोजच तुकडे करीत होता. 

आता त्याने यातील काही तुकड्यांची कुठे विल्हेवाट केली आहे? हत्येमागे नेमकी कोणते कारण घडले? त्याच्या  भार्इंदर पूर्व भागातील गीता आकाशदीप इमारतीमधील घरात एक वूड कटरही पोलिसांना मिळाले आहे. पण, हत्या करण्यासाठी मनोजने नेमका कशाचा वापर केला? यात त्याचे आणखी कोणी साथिदार आहेत का? या सर्वच  बाबींचा सखोल तपास करण्यासाठी नयानगर पोलिसांनी आरोपी मनोजला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी दीवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्यामुळे नयानगर पोलिसांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

टॅग्स :Mira Road Murderमीरा रोडmira roadमीरा रोडCourtन्यायालयPoliceपोलिस