गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:35 IST2025-01-17T05:30:31+5:302025-01-17T05:35:01+5:30
गोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती.

गोळीबार प्रकरणातील आराेपीला शिर्डी येथून अटक, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
कल्याण : जागेच्या वादातून भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणातील फरार आरोपी नागेश बडेराव याला शिर्डी येथून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
५ जण अटकेत
गोळीबाराची घटना २ फेब्रुवारीला घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्यासह पाचजणांना अटक केली होती.
आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. गायकवाड हे न्यायालयीन काेठडीत असल्याने ते तळोजा कारागृहात आहे.
राजकीय दबाव...
अटक आरोपींपैकी तिघांना नुकताच जामीन मिळाला. मात्र, या प्रकरणातील अन्य आरोपींना पोलिस अटक करीत नाही.
त्यांच्यावर राजकीय दबाब असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला होता. आरोपी वैभव गायकवाड, कुणाल पाटील आणि नागेश बडेराव फरार होते. गुरुवारी पोलिसानी नागेश बडेरावला शिर्डी येथून अटक केली.