Viral Video: एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक आरोपी पोलिसांच्या गाडीतून उतरतो आणि पळून जातो. नजरे समोरून आरोपी पळाल्यानंतर पोलिसही त्यांच्या मागे धावत सुटतात. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात. नेमकं प्रकरण काय, तेही जाणून घ्या...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हिडीओमध्ये जो आरोपी पोलीस ठाण्याच्या परिसरातून पळून जाताना दिसतोय, त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. दोघांनी जुन्या वादातून त्याने एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात पोलिसांनी त्याला अल्पवयीन असल्याने ताब्यात घेतले, तर त्याच्या साथीदाराला अटक केली.
वाचा >>तीन तासांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला, एक्स गर्लफ्रेंडची पाळलेली कोंबडी घेऊन पळाला
पोलीस त्याला सदर पोलीस ठाण्यात घेऊन आले. गाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर आरोपीने लंघुशंकेला जायचं असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस आधी उतरला आणि त्यानंतर आरोपी.
व्हिडीओमध्ये काय?
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस उतरल्यानंतर आरोपी उतरतो. दोन-तीन पावलं चालतो आणि पळत सुटतो. पायातील चपला निघतात आणि त्याचा तोल जातो. पण, तोल सावरून तो पळत सुटतो. त्यानंतर गाडीतील पोलीस आणि पोलीस ठाण्यातील पोलीस त्याच्या मागे धावतात. काही वेळ पाठलाग केल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
अल्पवयीन आरोपी आणि त्याचा साथीदार केशव शर्मा (वय १९) या दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. केशव शर्माला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले होते.
आधी चादरी तोंड दाबलं अन् नंतर चाकूने केले वार
अल्पवयीन आरोपी आणि केशव शर्मा या दोघांनी बुधवारी पहाटे ३ वाजता चमनेडमधील ज्येष्ठ नागरिक विद्याधर यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी आधी विद्याधर यांचे चादरीने तोंड दाबले आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात विद्याधर हे रक्तबंबाळ होऊन जखमी झाले.
या घटनेनंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल बंद केला आणि हमीरपूर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडजवळील दुगनेहडी जंगलात लपले होते. पोलिसांनी अखेर दोघांनाही पकडले, अशी माहिती हमीरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी दिली.