शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने आरोपी मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:01 IST

सीसीटीव्हीच्या देखभालीच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक बाब समोर आली आहे.दोन दिवस उलटूनदेखील अज्ञात इसमाचा शोध लागला नाही. रात्री ११ च्या सुमारास तिकीट तपासणीस कार्यालयावर अज्ञात इसमाने दगड भिरकाविला.

मुंबई - कुर्लारेल्वे स्थानकातील तिकीट तपासनीस कार्यालयावर दगडफेक झाली. या घटनेत तिकीट तपासनिसाला दगड लागून गंभीर जखम झाली. या प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक बाब समोर आली आहे. नादुरुस्त सीसीटीव्हीमुळे अज्ञात आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मध्य रेल्वेच्यासीसीटीव्ही आणि सीसीटीव्हीच्या देखभालीच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२८ ऑक्टोबर रोजी कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर सिकंदर सिंग यांची रात्रपाळी होती. रात्री ११ च्या सुमारास तिकीट तपासणीस कार्यालयावर अज्ञात इसमाने दगड भिरकाविला. या दगडफेकीत सिंग यांच्या चेहरा आणि डोळ्यावर गंभीर दुखापत झाली. दोन दिवस उलटूनदेखील अज्ञात इसमाचा शोध लागला नाही. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सीसीटीव्ही फूटेजमधील अज्ञात इसमाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे इसमाचा शोध घेण्यासाठी रेखाचित्रकाराची मदत घेण्यात येणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीrailwayरेल्वेKurlaकुर्लाMumbaiमुंबईPoliceपोलिस