शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेत तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:44 IST

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला..

पिंपरी : पिंपळेगुरव येथील काशिद पार्कमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी सुर्यकांत पुष्पेंद्र रावल (रा. मध्यप्रदेश) या आरोपीविरोधात सांगवी पोलिसांकडे सोमवारी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरूद्ध तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला. बदनाम करण्याची भिती दाखवली. २० १५ पासून तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तरूणीने ३१ डिसेंबला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या पालकांची मानसिक स्थिती  ठिक नसल्याने याबाबत तक्रार दिली नव्हती. मात्र सोमवारी आरोपी सुर्यकांत रावल यानेच तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. या आरोपाची तक्रार सांगवी पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मध्यप्रदेश, जबलपुरला असल्याने त्यास अद्याप अटक झालेली नाही. सांगवी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpale guravपिंपळेगुरवCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस