शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेदम मारहाणीनेच पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू; ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:07 IST

Custodial Death : आमगाव येथील आरोपी मृत्यू प्रकरण

ठळक मुद्देमृत्यूला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (वय ४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२, बक्कल नंबर १०१४), पोलीस शिपाई अरुण देवाजी उईके (३३, बक्कल नंबर १८७७) व दत्तात्रय ज्

गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार (वय ३०, रा. कुंभारटोली) याला तुरुंगातच बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीमुळे राजकुमार याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमगावच्या ठाणेदारासह पाचजणांवर खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोनवेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतले होते. मात्र त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने त्याला सोडून तिघांना अटक करून आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणात कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (वय ४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२, बक्कल नंबर १०१४), पोलीस शिपाई अरुण देवाजी उईके (३३, बक्कल नंबर १८७७) व दत्तात्रय ज्ञानोबा कांबळे (३३, बक्कल नं. १७८०) यांच्यावर सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३३०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमगाव पोलीस ठाण्यातील अप क्र ७०/२०२१ कलम ४६१, ३८०, ३४ या गुन्ह्याचा तपास करताना आमगाव पोलिसांनी अटक आरोपी राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण केल्यामुळे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात सीआयडीने आमगाव येथील न्यायाधीशांच्या उपस्थितीत या घटनेतील आयविटनेस सुरेश धनराज राऊत व राजकुमार गोपीचंद मरकाम यांचे बयाण नोंदविले. त्यांनीही आमगाव पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आमगाव पोलिसांनी लाकडी दांडा व पट्ट्याने जबर मारहाण केल्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला आहे.साीयआयडीने केले पुरावे गोळाआमगाव येथील पोलीस कोठडीत राजकुमारचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात सीआयडीने आतापर्यंत केलेल्या चौकशीत इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे यांचे अवलोकन करून ठाणेदार सुभाष चव्हाण, एपीआय महावीर जाधव, वाहनचालक खेमराज खोब्रागडे, पोलीस शिपाई अरुण उके यांनी अपराध क्रमांक ३२६/२०२० भादंविचे कलम ४५७,३८० मधील चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी आमगाव पोलिसांनी अटक असलेल्या आरोपींना लाकडी दांडा असलेल्या पट्ट्याने व हाता-पायाने बेदम मारहाण केली. त्याचा जीव जाऊ शकतो, याची माहिती असतानाही राजकुमार अभयकुमार याला पट्ट्याने व हाता-पायाने डोक्यात, पाठीवर, पायावर, हातावर, तळपायावर, कानावर, मानेवर मारहाण करून जीव घेतल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.सीआयडीने दिलेली तक्रारीची प्रत व्हायरलआमगाव येथील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद बाळकृष्ण वाकडे यांनी आमगाव पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीची प्रत गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल झाल्याने गुप्तता राहिलेली नाही. वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीत मृत राजकुमारला मारहाण केल्याच्या वैद्यकीय अहवालातील काही मुद्दे त्या फिर्यादीत देण्यात आले आहे. सीआयडीनेही या कोठडीतील अहवालासंदर्भात गुप्तता पाळली नाही. या प्रकरणाचा तपास सुरूच असताना सीआयडीने दिलेल्या तक्रारीची प्रत व्हायरल होणे ही तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटक