शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चंद्रपूरच्या सावलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:01 IST

Crime News: सावली येथील घटना : अवैध दारूविक्री प्रकरणातील आरोपी

सावली (चंद्रपूर) : सावली पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईलसदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सावली येथे शनिवारी पोलिसांनी गस्तीदरम्यान किसान नगर भागात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. यादरम्यान आरोपींनी पोलिसांनाच मारहाण केली. यावरून आकाश गरीबचंद मजोके, गरीबचंद मजोके, सुमित मजोके इतर एक असे चारही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. मात्र संध्याकाळच्या दरम्यान गरीबचंद यांच्या पत्नीने दोन्ही मुले व पतीला पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करायला लावले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र रविवारी यातील आकाश मजोके नामक आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईलसदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला तत्काळ सावली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास ठाणेदार रोशन शीरसाट व उपनिरीक्षक शशीकर चीचघरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस