शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीन जिल्हयात १७ गुन्हयांत फरारी असलेला आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 14:38 IST

जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत..

ठळक मुद्देपुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई 

बारामती: पुण्यासह तीन जिल्हयातील १७ गुन्हयांत  फरारी आरोपी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला यश आले आहे. त्याच्यावर  पुण्यासह सोलापुर,सातारा जिल्ह्यात दुचाकी  चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.आरोपी बारामतीमध्ये गणेशोत्सवासाठी आला होता. वेशांतर करुन सापळा रचून सिनेस्टाइल पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले आहे.पुणे ग्रामीण  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हयातील १२ , पुणे शहर आयुक्तालय २ , पिंपरी चिंचवड आयुक्तालय १, सातारा जिल्हा १, सोलापूर जिल्हा १ अशा एकूण १७ गुन्हयांमध्ये फरारी असलेला अट्टल गुन्हेगार अमोल उर्फ लखन विलास देशमुख (वय २९ रा.यवत ता.दौंड जि.पुणे, सध्या रा.खंडोबानगर, बारामती ) यास बारामती मोरगाव रोड, ढवाणवस्ती येथून ताब्यात घेतले आहे.     पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबविणेबाबत पथकाला आदेश दिलेले होते. त्यानुसार  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे  सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथक नेमण्यात आलेले होते.पथकाने शिक्रापूर , दौंड, लोणीकाळभोर, लोणीकंद, वडगाव निंबाळकर, जेजुरी, वानवडी, हडपसर, चाकण, फलटण सातारा, अकलूज या पोलीस स्टेशनचे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या एकूण १७ गुन्हयामध्ये दोन वर्षांपासून फरारी असलेला रेकॉर्डवरील आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख याची माहिती काढली . पोलीस त्याचा शोध घेत असल्याने त्याने यवत येथील घर बदलून कुरकुंभ, दौंड, पणदरे त्यानंतर बारामती येथे राहण्यास गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या पत्त्यावर जावून त्याची माहिती काढली.परंतू, वारंवार पत्ते बदलत असल्याने व घरी क्वचितच येत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. तो सध्या बारामती येथे राहण्यास गेला असून तो ट्रकवर कर्नाटक, बेंगलोर येथे ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची तसेच बारामती जवळील खंडोबानगर परिसरात अधूनमधून येत असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाली. त्या ठिकाणी बातमीदारामार्फत माहिती काढली.आरोपी लखन देशमुख हा दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी गणेश उत्सवासाठी बारामती येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने बारामती खंडोबानगर परिसरात वेशांतर करुन सापळा रचला.मात्र, फरारी आरोपी अमोल देशमुख  बारामती- मोरगाव रस्त्यावरील ढवाणवस्ती येथे पोलिसांची चाहूल लागल्यावर तो मोटरसायकलवर पळून जाण्याच्या तयारीत असताना सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली यापूर्वीच त्याच्या साथीदाराकडून हस्तगत केलेल्या आहेत.     आरोपी लखन देशमुख याचेवर यापूर्वी पुणे जिल्हयात यवत, बारामती शहर, बारामती तालुका या पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने फरारी असताना आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास चालू आहे.आरोपीस पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेलेआहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक