कोपर परिसरात घरात घुसून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:28 IST2020-12-21T05:27:48+5:302020-12-21T05:28:05+5:30

crime news : पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाघ याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Accused arrested for molesting a woman after breaking into a house in Kopar area | कोपर परिसरात घरात घुसून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

कोपर परिसरात घरात घुसून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

डोंबिवली : महिला घरात एकटी असताना, तिच्या घरात घुसून महेश वाघ उर्फ मक्या या सराईत गुंडाने चाकूच्या धाकाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार डाेंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ५च्या सुमारास घडला. वाघ याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाघ याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाघ हा सराईत गुंड असून, त्याच्याविरोधात या आधीही चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ज्यावेळी हा गुंड घरात घुसला, त्यावेळी महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली, पण या गुंडाची परिसरात दहशत असल्याने तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. चाकूच्या धाकाने अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाघच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत महिलेने घराबाहेर धाव घेतली आणि थेट विष्णुनगर पोलीस ठाणे गाठत वाघ याच्याविरोधात तक्रार दाखल केली.  
राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांना आळा बसावा, म्हणून सरकारने दिशा कायदा आणला आहे. या कायद्यान्वये आरोपीविरोधात कारवाई होणार आहे. 

Web Title: Accused arrested for molesting a woman after breaking into a house in Kopar area