शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 22:07 IST

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केली होती हत्या

ठळक मुद्दे दुमकाचे पोलीस अधीक्षक रमेश यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत ज्या ट्रेन मध्ये आरोपी बसला होता ती ट्रेन २० मिनिटात कल्याण स्टेशनला पोहचणार असल्याची माहिती दिली.घटनेच्या २४ दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कल्याण : महात्मा फुले पोलिसांनी पकडलेल्या ६ वर्षीय चिमुकलीवर सामुहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला दुमका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटात फोटोच्या आधारे आरोपी मिठू राय याला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व.पो.नि. प्रकाश लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले आहे. 

झारखंडच्या दुमका जिल्ह्यात असलेल्या रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षीय अल्पवयीन चिमुकालीवर तिच्या एका नातेवाईकाने आपल्या मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केला होता आणि तिची हत्या करून एका जागेत तिचा मुतदेह पुरला होता. अखेर मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला मात्र या प्रकरणाचा मुख्य आरोपी मिठू राय हा फरार झाला होता. मिठू हा मुंबईच्या दिशेने पळाला असल्याची माहिती दुमका पोलिसांना  मिळाली. दुमकाचे पोलीस अधीक्षक रमेश यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत ज्या ट्रेन मध्ये आरोपी बसला होता ती ट्रेन २० मिनिटात कल्याण स्टेशनला पोहचणार असल्याची माहिती दिली.पोलिसांकडे अवघ्या २० मिनिटांचा कालावधी असल्याने तत्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक कल्याण स्टेशनला रवाना झाले आणि मिळालेल्या फोटोच्या आधारे आरोपीला अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत मिठू राय याला पकडले. या फरार असलेल्या मुख्य आरोपीला पकडत त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे साथीदार पंकज मोहाली आणि अशोक राय या दोघांचा नाव पत्ता सुद्धा दुमका पोलिसांना देण्यात आला.घटनेच्या २४ दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांमुळे हे शक्य झाले असून या गुन्ह्यात आरोपीला पकडून त्याच्या साथीदारांचा छडा लावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सत्कार करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकkalyanकल्याणRapeबलात्कारCourtन्यायालय