शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

सराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 21:31 IST

8 चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर 32 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका सराईत घरफोडी चोराला अटक करून त्याच्याकडून साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत केला. तसेच 8 चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर 32 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग परिमंडळ-4 मधील गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी एक सराईत घरफोडी चोर 10 आगष्ट रोजी बदलापूर येथील रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसरात संशयीतरित्या फिरणाऱ्या कैलास चिंतामण मोरे याला अटक केली. पोलिसांनी त्याला बोलते केले असता तीन मित्र व स्वीफ़्ट गाडीने बंद घरात भरदिवसा चोरी करीत करीत असल्याची माहिती दिली. परिमंडळातील 8 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली कैलासने दिल्यावर, पोलिसांनी झाडाझडतीत 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने व 2 लाख 10 हजार किमतीची चोरी वेळी वापरलेली स्वीफ़्ट गाडी हस्तगत केली.

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत कैलास मोरे यांच्यावर धुळ्यासह गुजरात सिल्वासा, वसई, पालघर आदी परिसरात तब्बल 32 घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. तो काही दिवसांपूर्वीच आर्थर जेलमधून सुटून बाहेर आला आहे. पोलीस त्याच्या तीन साथीदारांसह अधिक तपास करीत आहे. त्याच्याकडून घरफोडीचे अनेक गुन्हे उघड करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेRobberyदरोडाArrestअटकPoliceपोलिस