अपघातग्रस्त आयवा ट्रकला कार्लेखिंडीत अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न

By राजेश भोस्तेकर | Updated: April 24, 2023 14:58 IST2023-04-24T14:57:31+5:302023-04-24T14:58:09+5:30

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Accidental Iwa truck attempted to be burnt by unknown persons | अपघातग्रस्त आयवा ट्रकला कार्लेखिंडीत अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न

अपघातग्रस्त आयवा ट्रकला कार्लेखिंडीत अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग वडखळ मार्गावर कार्ले खिंड येथे रविवारी आयवा ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातानंतर ट्रक हा रस्त्याच्या कडेला पलटी झाला होता. अपघात झालेल्या ट्रकचे टायर हे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटिव्हीच्या आधाराने पोलीस आता अज्ञाताचा शोध घेत आहेत. 

रविवारी २३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अलिबाग कडे येणाऱ्या आयवा ट्रकला कार्ले खिंडीत अपघात झाला होता. ट्रक मधील खडी तसेच ऑईल हे रस्त्यावर पसरले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जे सी बी च्या सहाय्याने खडी बाजूला करून आणि ऑईल वर माती टाकून रस्ता वाहतुकीला खुला केला होता. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली होती. अपघातग्रस्त ट्रक हा कडेला पलटी झाल्याने तशाच अवस्थेत पडून होता. मध्यरात्रीच्या सुमारास कोणी अज्ञाताने ट्रकच्या टायरला आग लावली. यामध्ये ट्रकचे सर्व टायर हे जळाले आहेत. सुदैवाने डिझेल टाकीपर्यंत आग न गेल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेबाबत अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अलिबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accidental Iwa truck attempted to be burnt by unknown persons

टॅग्स :alibaugअलिबाग