शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:53 IST

पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता.

ठळक मुद्देदुचाकीची झाली होती धडक 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.पाचपावली पोलीस ठाण्यातील ड्यूटी आटोपून सौंंदरकर आपल्या दुचाकीने (एमएच ४०/व्हीयु ३५६९) घराकडे परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चिंतामणी गोटेफोडे या दुचाकीचालकाची (एमएच ३१/ईटी ४४१३) समोरासमोर धडक बसली. हा अपघात जुना काटोल नाका चौकातील एका वळणाजवळ घडला. मेंदूला जबर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेतच होते. वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एसआरपीएफमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले लहान भाऊ भरत आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसnagpurनागपूर