अंबरनाथ - ४५ वर्षीय तक्रारदार यांच्या मेसर्स क्लासिक कॉम्प्युटर नावाच्या कंपनीने अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन कार्यालयातील संगणक दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतले होते. या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून जमा केलेले सिक्युरिटी डिपॉझिट परत देण्यासाठी आणि भविष्यात संगणक देखभालीचे टेंडर देण्यासाठी 16 हजाराची लाचेची मागणी शांतिकुमार बाबुराव पाटील (वय 57) यांनी केली. पाटील हे विभागीय लेखापाल (वर्ग-3) पदावर कार्यरत होते. पाटील यांनी तडजोडी अंती 14 हजारांची रक्कम ठरवली. याबाबत तक्रारदार यांनी काल लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (एसीबी) माहिती दिली. त्यानुसार एसीबीने आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास सापळा रचून पाटीलला १४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
लेखापालास लाच घेताना एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:18 IST