लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा
By रवींद्र देशमुख | Updated: March 14, 2024 19:11 IST2024-03-14T19:10:05+5:302024-03-14T19:11:14+5:30
पन्नास हजार रुपये खंडणीचीही मागणी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा
रवींद्र देशमुख, सोलापूर: पिंपरी चिंचवडच्या तरुणानं सोलापूरच्या तरुणीशी शेअर चॅटद्वारे मैत्री केली. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. काढलेले फोटो सोशलमीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांच्या खंडणमीची मागणी केल्याबद्दल पिडित तरुणीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ ऑक्टोबर २०२३ ते नंतर वेळोवेळी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पिडितेच्या फिर्यादीनुसार रोहित राहूल काकडे (वय- २३, पिंपरी चिंचवड, पुणे), व अन्य एक तरुणी अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडिता ही सोलापूरची असून, ती खासगी नोकरी करते. शेअर चॅटद्वारे तिची नमूद आरोपीशी ओळख झाली. त्यातून मैत्रीत रुपांतर झाले. याचा गैरफायदा घेऊन नमूद आरोपीने १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापुरात येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. तिच्या नकळत अश्लील फोटो काढले. त्यानंतर पिडितेला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पिडितेवर पुन्हा अत्याचार केला. यामध्ये नमूद आरोपीच्या साथीदारानं मदत केली. फोटो व्हायरल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे. तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.