अल्पवयीन इन्स्टाग्राम फ्रेंडवर अत्याचार; प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अतिप्रसंग
By योगेश पांडे | Updated: January 31, 2024 17:34 IST2024-01-31T17:34:05+5:302024-01-31T17:34:32+5:30
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली

अल्पवयीन इन्स्टाग्राम फ्रेंडवर अत्याचार; प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अतिप्रसंग
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका अल्पवयीन इन्स्टाग्राम फ्रेंडला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अनुराग संजय खोटे (२०, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे.
अनुरागची २०२३ साली एका १७ वर्षीय मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्याने तिला चॅटच्या माध्यमातून मैत्रीसाठी विचारले व त्यानंतर तिचा फोन नंबर घेत तिच्याशी बोलणे सुरू केले. त्याने तिला काही काळाने स्वत:च्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २७ एप्रिल २०२३ रोजी त्याने तिला स्वत:च्या घरी बोलविले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. यात ती मुलगी गर्भवती राहिली. तिच्या आईला संशय आला. तिने मुलीला विचारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने पाचपावली पोलीस ठाण्यात अनुरागविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.