शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

शंभरी भरली! शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील 10 वर्षांपासून फरार आरोपी मुंबईत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:11 IST

या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीसारखे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

ठळक मुद्देआरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष - ७ कडून विक्रोळी रेल्वे स्थानकावरून जेरबंद करण्यात आले आहे. आरोपीस यापुर्वी एकूण ৪ गुन्ह्यांत न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे.२०१८ कालावधीमध्ये दादर पोलीस ठाण्याकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. 

मुंबई - गेल्या १० वर्षापासून शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील फरार तसेच मुंबईत रेल्वेमध्ये जबरीने मंगळसुत्र चोरी करणाऱ्या पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष - ७ कडून विक्रोळी रेल्वे स्थानकावरून जेरबंद करण्यात आले आहे. या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीसारखे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडातील गेल्या १० वर्षांपासून मोक्का गुन्हयातील फरार आरोपीच्या कक्ष - ७ ने  विकोळी रेल्वे स्थानकयेथून गुप्त माहितीदारांमार्फत माहितीद्वारे मुसळ्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे कक्ष - ७ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दोरकर व पथकाने विकोळी रेल्वे स्थानक, विकोळी (पूर्व) , या ठिकाणी जाऊन फरार आरोपीच्या वर्णनानुसार शोध घेतला असता, तो एका मंदिर परिसरामध्ये आढळून आला. या आरोपीला कक्ष - ७च्या  कार्यालयात आणून त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता प्रथम त्याने  सन २०११ मध्ये शिर्डी येथील पाप्या शेख टोळीने इसम नामे प्रविण गोदकर व रवीत पटनी यांचा खून केला होता. या खुनाबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे नोंद असलेला गुन्हा भा. दं. वि. कलम ३०२, १२०५, ३६३, ३६४, ३६८, १४३, १४७, १४८, १४९, २०१, ३४२,४६३, ४६४,२१६ सह कलम ३(१).३(२).३(४) मोक्का कायद्यांतर्गत दाखल आहे. आरोपीस अटक झाली होती. या गुन्हयातून जामीनावर मुक्त झाल्यानंतर तो अदयापपर्यंत फरार झाला होता. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता नाशिक येथील विशेष मोक्का न्यायालय यांनी या आरोपीस फरार घोषित केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तसेच नमुद अटक आरोपीकडे अधिक कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदारांसह सी.एस.एम. टी. रेल्वे स्थानक परिसरात एका रेल्वे महिला प्रवाश्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरल्याचे कबूल केले. या प्रकरणी सी.एस.एम.टी. रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असल्याची खात्री झाल्यानंतर नमूद आरोपीत यास पुढील कारवाईसाठी सी.एस.एम.टी. रेल्वे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीचे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्याबाबत त्याला अद्यापपर्यंत अटक झाली नसल्याचे त्याने सांगितले आहे. नमुद आरोपी हा मुंबईतील रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत गु्हयासंदर्भातील अभिलेख्यावरील आरोपी असून नमुद आरोपीस यापुर्वी एकूण ৪ गुन्ह्यांत न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. तसेच सदर आरोपीस २०१८ कालावधीमध्ये दादर पोलीस ठाण्याकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. 

टॅग्स :ArrestअटकMurderखूनMumbaiमुंबईPoliceपोलिस