मुंबई - शस्त्र बाळगल्याचा आरोप असलेल्या आणि न्यायालयात तारखेला हजर न राहणाऱ्या गुंडाला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने नाशिकमधून त्याला ताब्यात घेतले.मनोज लक्ष्मण वझारे (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नाशिकच्या गंगापूर रोडचा आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या तारखांवर तो काही दिवस हजर राहिला. मात्र, २०१४ पासून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट काढत, त्याला लवकर अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार, कक्ष ८ त्याच्या मागावर होते. मात्र, बऱ्याच वेळा पोलिसांना चकमा देण्यात तो यशस्वी झाला. अखेर या कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांना वझारे नाशिकला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते आणि हेड कॉन्स्टेबल कानडे, माने या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
फरार आरोपीला नाशिकमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:02 IST
मनोज लक्ष्मण वझारे (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे.
फरार आरोपीला नाशिकमधून अटक
ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने नाशिकमधून त्याला ताब्यात घेतले.२०१४ पासून तो बेपत्ता झाला होता. तो मूळचा नाशिकच्या गंगापूर रोडचा आहे.