कार चालकाने देशभर जाळे विणले; 20 लाख लोकांकडून तब्बल 14800 कोटी हडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:48 AM2019-09-11T10:48:39+5:302019-09-11T10:53:06+5:30

आदर्श क्रेडीट सहकारी सोसायटी घोटाळ्याचे 40 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

About 14800 crores were looted by 2 million people in Adarsh credit society scam bi virendra modi | कार चालकाने देशभर जाळे विणले; 20 लाख लोकांकडून तब्बल 14800 कोटी हडपले

कार चालकाने देशभर जाळे विणले; 20 लाख लोकांकडून तब्बल 14800 कोटी हडपले

googlenewsNext

पाली : सहकार क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आदर्श क्रेडीट सहकारी सोसायटी घोटाळ्याचे 40 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हा घोटाळा कसा झाला, कोणकोण यामध्ये सहभागी होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली नव्हती. 


सिरोहीसारख्या छोट्या शहरामध्ये वीरेंद्र मोदी (वीरू मोदी) कधी काळी टॅक्सी चालकाचे आणि कॅसेट रेकॉर्डिंगचे काम करत होता. या वीरू मोदीने भाऊ मुकेश आणि भरतच्या सोबतीने देशभरात 28 राज्यांमध्ये सोसायटीच्या 806 शाखा खोलल्या होत्या. या सोसायटीमध्ये कुटुंबातील 11 लोकांसह नोकर आणि ड्रायव्हरलाही त्याने संचालक बनविले होते. दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत 20 लाख लोकांकडून त्याने 14800 कोटी रुपये हडपले होते. 


यापैकी 12414 कोटी रुपये त्याने नातेवाईक आणि नोकरांच्या नावे उघडलेल्या बनावट कंपन्याना वळते केले होते. एसओजीने 6 महिने चौकशी करून मोदीच्या कुटुंबातील 11 जणांसह अन्य 3 लोकांना अटक केली आहे. 
आरोपपत्रामध्ये इटलीचा ठग चार्ल्स पाँजी साऱखी फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. या पाँजीने 1920 च्या दशकामध्ये उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये बनावट कंपन्या उघडून 20 दशलक्ष डॉलरचा घोटाळा केला होता. वीरेंद्र मोदीने अशाचप्रकारे भारतीयांना ठकविले आहे. 


1999 मध्ये पहिली शाखा
सिरोहीमध्ये वीरेंद्र आणि मुकेशने पहिली शाखा उघडली होती. 4 वर्षांत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 309 शाखा खोलल्या. यानंतर 2012 पर्यंत या शाखांचा आकडा 806 वर पोहोचला होता. नोटाबंदीमध्येही त्याने 223 कोटी रुपये बदलले होते. तसेच शेकडो बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या. 


2018 मध्ये पितळ उघडे पडले
वीरु मोदीच्या या घोटाळ्याची पोलखोल जुलै 2018 मध्ये झाली. एसओजीला तक्रार मिळाल्यानंतर 6 महिने चौकशी करण्यात आली. यामध्ये गुंतवणूकदारांचा आकडा 20 लाखांवर असल्याचे समोर आले. डिसेंबर 2018 मध्ये मोदीला अटक करण्यात आली होती. 

Web Title: About 14800 crores were looted by 2 million people in Adarsh credit society scam bi virendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.