शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

 नैराश्यातून प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लाऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:27 IST

अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. 

मुंबई -  बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेत अभिजीतने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने सुसाईट नोट लिहली होती. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहलं आहे. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून भांडुप पोलिसांनी ती चिठ्ठी आणि अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद असून काल सकाळी ६. ३० वाजता हि घटना घडली अशी माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी दिली. अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. 

पुढे खाडे यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी घरातल्या सीलिंग पंख्याला लटकून अभिजीने आत्महत्या केली आहे. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सगळा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तात्काळ  रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.प्रसिद्ध डान्सर आणि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्या तीन महिन्यापासून माहेरी गेल्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे. मात्र, मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला. त्यामुळे तो खूप नैराश्यात होता. तर दुसरीकडे हाती कोणतंही काम नसल्याने त्याला त्याचीही काळजी वाटत होती. याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून हाती लागलेल्या सुसाईड नोटचाही पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडSuicideआत्महत्याSalman Khanसलमान खानRanveer Singhरणवीर सिंग