शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, त्याने आत्महत्या केली; आईच्या कोलांटउडीने सभापतींच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:17 IST

उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजितच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे. 

लखनौ -  उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजितच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्याच्या आईने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्या मुलग्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अभिजीतच्या मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे. अभिजितच्या आईनेच त्याची हत्या केल्याची तसेच तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी सकाळी दिली होती. मात्र या प्रकरणी अटक करण्यात आलेली अभिजीतची आई मीरा यादव यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. माझा मुलगा अभिजीत याने गळफास लावून आत्महत्या केली, असा दावा मीरा हिने केला आहेत. तसेच आपले पती रमेश यादव यांनी मुलाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, मीरा यादव यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवची त्याच्या आईनंच त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा, म्हणून त्याची हत्या केल्याचे, त्याच्या आईने पोलिसांना सांगितले होते. अभिजीतच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आईने दिली आहे होती.  रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह रविवारी हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली होती. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आला. त्यावेळी आपल्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यावर अभिजीत झोपला. सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला, अशी माहिती यादव परिवाराकडून पोलिसांना देण्यात आली होती.   अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवून कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्यानं पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्याने झाल्याचं स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश