खारघरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार; मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 13:36 IST2021-10-30T13:35:27+5:302021-10-30T13:36:58+5:30
Crime News : खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या इनामपुरी गावात पती-पत्नी आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत.

खारघरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार; मनसे आक्रमक
पनवेल : खारघरमधील इनामपुरी गावातील एका २४ वर्षीय युवकाने १५ वर्षांच्या मुलीस पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुलीचे अपहरण केले असल्याची शंका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.
खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या इनामपुरी गावात पती-पत्नी आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत. मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये, तर तिची आई घरकाम करते. दरम्यान, गावात राहणाऱ्या रोशन सरोज नावाच्या युवकासोबत मुलीची ओळख होती.
सोमवार दुपारी एकच्या सुमारास आई घरी आली असता मुलगी दिसून आली नाही. मुलीचा शोध घेतली असता ती आढळून आली नाही. दरम्यान, दुपारनंतर रोशनदेखील गायब असल्याचे आणि त्याचा मोबाइलदेखील बंद असल्याचे आढळून आले. सदर पंधरावर्षीय मुलीस रोशन याने फूस लावून पळवून नेल्याची मुलीच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीचा शोध न लागल्यामुळे मनसेने कारवाईची मागणी केली आहे.