शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे अपहरण, हत्या करणारा चोरीच्या कारमधून पळाला; जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:44 IST

त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

ठळक मुद्देआरोपीचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो तामिळनाडूचा आहे. कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.

नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे कारसह अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन व नऊ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो सराईत गुन्हेगार असून त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, याबाबत पोलिसांना अद्यापही संशय असल्याने अधिक तपास सुरू आहे. आरोपीचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो तामिळनाडूचा आहे. त्याच्याविरोधात ५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

उलवे सेक्टर 19 येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली होती. तेथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत शेलगरचे रहिवासी बाळकृष्ण भगत हे पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्या पत्नी प्रभावती भगत (56) ह्या कारमध्येच बसल्या होत्या. याच वेळी कार सुरू असल्याने व कारमध्ये प्रभावती ह्या एकटय़ाच बसल्या असल्याची संधी साधून एक जण कारमध्ये घुसला. त्याने कारसह प्रभावती यांचे अपहरण करून त्यांना सेक्टर 23 परिसरात नेले. त्या ठिकाणी प्रभावती यांच्यावर गोळी झाडून त्याने पळ काढला होता. या वेळी प्रभावती यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एनआरआय पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ १, परिमंडळ २ तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासासाठी मिळवले होते. त्याद्वारे संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बुधवारी संध्याकाळी खारघर परिसरात सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. झडती वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगङिान व नऊ काडतुसे आढळून आली. चौकशीत त्याचे नाव अशोककुमार मुर्गन कोनार (42) असल्याचे समोर आले. तसेच त्याने प्रभावती यांची हत्या केल्याचीही कबुली दिली. तसेच तोही उलवे सेक्टर 9 येथील राहणारा आहे. सखोल चौकशीअंती बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याने लुटीच्या उद्देशानेच प्रभावती यांचे अपहरण करून पळ काढल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पंकज डहाणो यांनी सांगितले. तर या प्रकरणी अधिकही चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्ह्यानंतर तो ज्या कारने उलवे परिसरातून पळाला होता, त्याच कारसह तो खारघरमध्ये आढळून आला. ही कार त्याने वाशी परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.

टॅग्स :ArrestअटकKidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई