Latur Crime | बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
By आशपाक पठाण | Updated: December 25, 2022 23:35 IST2022-12-25T23:34:34+5:302022-12-25T23:35:10+5:30
लातूर-बार्शी रोडवरील बारा नंबर पाटीची घटना

Latur Crime | बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
आशपाक पठाण / लातूर: बार्शी रोडवरील १२ नंबर पाटीनजीक उस्मानाबाद-लातूर बसने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील अंकोली येथील तुकाराम सहदेव मोरे (१९) हा युवक दुचाकी (एमएच २४ पी ८२)वर बसून गावाकडे जात होता. १२ नंबर पाटील येथे उस्मानाबाद-लातूर बस (एमएच २० बीएल ४२३३) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. यात तुकाराम मोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक ए. व्ही. डाके, पो.हे.कॉ. पी. बी. वांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी सचिन उद्धव जाधव (रा. चिंचोलीराव वाडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.