किरकाेळ कारणावरून झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: April 14, 2023 14:24 IST2023-04-14T14:24:45+5:302023-04-14T14:24:52+5:30
साखरखेर्डा येथील घटना, आराेपी युवकाविरुद्ध गुन्हा

किरकाेळ कारणावरून झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू
संदीप वानखडे, साखरखेर्डा (बुलढाणा): किरकाेळ कारणावरून दाेन युवकात झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १३ एप्रिल राेजी साखरखेर्डा येथे घडली. याप्रकरणी साखरखेर्डा पाेलिसांनी १४ एप्रिल राेजी आराेपी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ शेख आदील शेख अकील असे मृतक युवकाचे नाव आहे़.
सावंगी भगत येथील प्रशांत याेगेंद्र गवई व साखरखेर्डा येथील शेख आदील शेख अकील यांच्यात १३ एप्रिल राेजी किरकाेळ कारणावरून वाद झाला़ या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले़ मारहाण करताना शेख आदील शेख अकील याचे नाक व गळा दाबल्या गेल्याने ताे बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून ग्रामीण रुग्णालय चिखली येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले़ दरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मृतकाचा भाऊ शेख सोहील शेख अकील याने १४ एप्रिल राेजी पाेलिसात तक्रार दिली आहे़ त्यावरून सारखेर्डा पाेलिसांनी प्रशांत गवई विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करीत आहेत.