प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीला बुक्क्यांचा मार; दोन महिन्यांपासून सुरू होता पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 10:22 IST2022-10-24T10:21:08+5:302022-10-24T10:22:08+5:30

अंधेरीत परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय रेश्मा (नावात बदल) महाविद्यालयाच्या गेटकडे असताना लोखंडेने तिचा हात पकडला आणि दुसरा हात खांद्यावर ठेवून तिला ओढत पुढे नेले. तेथे तिला प्रपोज केले.

A young woman is beaten by bullies for refusing love; The chase had been going on for two months | प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीला बुक्क्यांचा मार; दोन महिन्यांपासून सुरू होता पाठलाग

प्रेमाला नकार दिला म्हणून तरुणीला बुक्क्यांचा मार; दोन महिन्यांपासून सुरू होता पाठलाग

मुंबई : कॉलेजच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थिनीचा हात पकडून तिला ओढत पुढे आणून प्रपोज केला. विद्यार्थिनीने नकार देताच तिला कानाखाली मारून हातापायावर बुक्का मारल्याची धक्कादायक घटना अंधेरीत घडली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी ऋतिक सतीश लोखंडे (२०) याला अटक केली आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून तरुणीचा पाठलाग करत होता.

अंधेरीत परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय रेश्मा (नावात बदल) महाविद्यालयाच्या गेटकडे असताना लोखंडेने तिचा हात पकडला आणि दुसरा हात खांद्यावर ठेवून तिला ओढत पुढे नेले. तेथे तिला प्रपोज केले. मात्र रेश्माने नकार देताच त्याने तिला हाताने मारहाण केली. तिच्या कानाखाली मारून हातापायावर बुक्का मारला. तरुणीने तेथून कसाबसा पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गेल्या दोन महिन्यापासून ऋतिकने रेश्मासोबत जवळीक साधण्यासाठी वारंवार पाठलाग केला. अखेर, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: A young woman is beaten by bullies for refusing love; The chase had been going on for two months

टॅग्स :Arrestअटक