शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

किन्नरच्या प्रेमात पडला, लग्नही केलं; 5 वर्षांनंतर म्हणतोय कोण पती, कोणतं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 15:37 IST

लग्नानंतर 5 वर्ष दोघेही पती-पत्नीसारखे सोबत राहिले. पण आता पंकज पत्नी चंदाला सोडून गुपचूप दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता.

मुजफ्फरपूरच्या एका ऑर्केस्ट्रामध्ये  काम करणारी किन्नर चंदासोबत मोतीपूर येथील पंकजने मंदिरात लग्न केलं होतं. दोघे 5 वर्षापासून सोबत राहत होते. पण पती बनलेला पंकज दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच किन्नर चंदाने मोतीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूरच्या सिद्दकी लेनमध्ये राहणारी चंदा आणि नारियार पानापूर येथील पंकज कुमार सााह सोबत एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होते. यादरम्यान पंकज चंदाच्या प्रेमात पडला. दोघेही सोबत राहू लागले होते आणि मग एक दिवस त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं.

लग्नानंतर 5 वर्ष दोघेही पती-पत्नीसारखे सोबत राहिले. पण आता पंकज पत्नी चंदाला सोडून गुपचूप दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. याची माहिती मिळताच किन्नर चंदाने पोलिसात पंकजला पती असल्याचं सांगत आणि लग्नाचे फोटो दाखवत तक्रार दाखल केली आहे. 

तक्रारीनुसार, चंदा आपल्या दोन बहिणीचं आणि आईचं पोट भरण्यासाठी  ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करत होती. यादरम्यान पाच वर्षाआधी तिची भेट पंकज कुमार शाहसोबत झाली. दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी सहमतीने 2018 मध्ये हिंदू रितीरिवाजाने लग्न केलं. नंतर ते पती-पत्नीसारखे राहू लागले.

चंदाने आरोप केला की, तिने तिच्या कमाईने पंकजसाठी घर बांधलं. पण आता पंकज दुसरं लग्न करत आहे. तिला घरातून काढलं आहे. पती आता तिला तिचे पैसेही परत करत नाहीये. चंदाचा आरोप आहे की, कथितपणे पती तिला जीवे मारण्याची धमकीही देत आहे. पती आता तिला कोणतं लग्न, कोणता पती? असं म्हणतो.

तेच आरोपी तरूण पंकज कुमार शाह म्हणाला की, त्याचं लग्न कोणत्याही किन्नरसोबत झालं नाही. तो तिच्यासोबत ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होती. यादरम्यान किन्नरने त्याला जाळ्यात अडकवलं. ज्यानंतर ते सोबत राहू लागले होते. पण सोबत राहत असताना सुद्धा तिचं वागणं बरोबर नव्हतं. नेहमीच मारहाण आणि भांडण करत होती. ती मला गुलामासारखी ठेवत होती.

याबाबत पोलीस म्हणाले की, किन्नर चंदाने पंकज साह याला आपला पती सांगत पैसे हडपणे, दगा देणे,  दुसरं लग्न करण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. सध्या चौकशी सुरू असून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न