मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला
By सदानंद नाईक | Updated: September 13, 2023 15:04 IST2023-09-13T15:03:16+5:302023-09-13T15:04:34+5:30
या रागातून रजनी ठाकूर यांना शिवीगाळ करून पाठ, छातीसह सर्वांगावर नारळ कापण्याच्या चाकूने वार केले.

मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला
उल्हासनगर : मयत झालेल्या भावाने उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून मंटूकुमार राजेंद्र साव यांच्यावर रजनी ठाकूर याने चाकूने वार जरून गंभीर जखमी केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, संत कंवाराम पुतळ्या जवळील महालक्ष्मी ज्यूस सेंटर दुकान जवळ सोमवारी रात्री साडे १० वाजता मंटूकुमार राजेंद्र साव उभा होता. त्यावेळी आलेले रजनी ठाकूर यांनी मंटूकुमार साव यांच्या मयत झालेल्या भावाने, उसने घेतलेल्या पैश्याची मागणी केली. मात्र साव यांनी पैसे देण्यास नकार दिला.
या रागातून रजनी ठाकूर यांना शिवीगाळ करून पाठ, छातीसह सर्वांगावर नारळ कापण्याच्या चाकूने वार केले. मंटूकुमार साव या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालअसून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.