शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:28 IST

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेत असलेल्या युवकाच्या गळ्यातून फास काढून त्याला खाली उतरवले. 

उत्तर प्रदेशातील देवरिया पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका युवकाचा जीव वाचला आहे. अवघ्या १२ मिनिटांनी पोलिसांनी या तरुणाला फासावरून खाली उतरवले. या युवकाच्या वडिलांनी कर्ज घेतले होते. घरची परिस्थिती बिकट होती. बँकेकडून सातत्याने कर्ज फेड करण्यासाठी फोन करून छळले जायचे. बापासाठी काहीच करता येत नाही या नैराश्येत युवकाने गळफास घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली. 

विशेष म्हणजे युवकाच्या मित्रांच्या अगोदर मेटाने ही स्टोरी पाहिली आणि तात्काळ पोलिसांना सूचित केले. सूचना मिळताच १२ मिनिटांच्या आत पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि युवकाचा जीव वाचवला. पचौहा गावातील युवकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'भाई लोग माफ करना, आज मै मरने जा रहा हू' अशी पोस्ट टाकली. मेटाने याची दखल घेत तातडीने लखनौच्या पोलीस मुख्यालयाला सूचित केले. त्यानंतर पोलीस महासंचालक राजीव कृष्णा यांच्या निर्देशाने १२ मिनिटांत पोलिस युवकाच्या घरी पोहचली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेत असलेल्या युवकाच्या गळ्यातून फास काढून त्याला खाली उतरवले. 

कर्जबाजारीपणामुळे आयुष्याला कंटाळला

१२ जून रोजी ही घटना घडली. एक १९ वर्षीय युवक गळफास घेऊन आत्महत्येच्या तयारीत होता. त्याने गळ्यातील फाशीचा फोटो क्लिक करून इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यासोबतच भाई लोग माफ करना, आज मै मरने जा रहा हू असा मेसेज लिहिला. त्यानंतर त्याची ही स्टोरी मित्रांनी पाहायच्या आधीच मेटा कंपनीने पाहिली. दुपारी ३.४४ वाजता मेटा कंपनीकडून लखनौ पोलिस मुख्यालयाला संबंधित प्रकार कळवला. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी तातडीने सूत्रे हलवून पोलिसांनी अलर्ट केले. 

मेटा कंपनीकडून पाठवलेला अलर्ट आणि मोबाईल नंबरवरून युवकाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. लोकेशन मिळताच भलुअनी उपनिरिक्षक १२ मिनिटांत युवकाच्या घरी पोहचले. तिथे घरच्यांकडून युवकाची माहिती घेतली. युवक त्याच्या खोलीत गळफास घेण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तात्काळ पोलिसांनी खोलीत जात त्याला फासावरून खाली उतरवले. हा युवक बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आई वडिलांनी घेतलेले कर्ज, ते आपण फेडू शकत नसल्याची खंत युवकाला होती. त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असं तपासात पुढे आले. 

टॅग्स :PoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम