छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या
By नामदेव भोर | Updated: October 30, 2022 14:57 IST2022-10-30T14:57:02+5:302022-10-30T14:57:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जेलरोडच्या मॉडेल कॉलीन परिसरात एका तरुणाने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून घेत ...

छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जेलरोडच्या मॉडेल कॉलीन परिसरात एका तरुणाने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) घडली आहे.
जेलरोड मॉडेल कॉलनी येथील समर्थ छाया रो हाऊस मध्ये राहणारा युवक योगेश प्रभाकर सोमवंशी (२९) हा शुक्रवारी रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला. शनिवारी सकाळी योगेशचे वडील उठविण्यास गेले असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले. योगेश झोपलेल्या खोलीचा दरवाजा तोडून उघडला असता योगेशने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, मात्र नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.