शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घरातील पलंगावर निपचित पडून आढळला महिलेचा मृतदेह; गळ्यावर खरचटल्याचे निशाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:57 IST

तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आशिष गझबिये यांनी दिली.

वर्धा: घरातील पलंगावर निपचित पडून असलेल्या विवाहितेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याला खरचटल्याचे निशाण असल्याने घरच्यांनी याबाबत तळेगाव पोलिसात जात नेमका मृत्यू कशाने झाला हे तपासण्याची मागणी दिलेल्या तक्रारीतून केली.

तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आशिष गझबिये यांनी दिली. मेघा गौरिशंकर ढोबाळे (२१, रा. जसापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुनीता अजाब बोबडे (रा. देववाडी) या कुटुंबासह घरी असताना जावई गौरीशंकर ढोबाळे हा घरी आला. रात्री गौरीशंकर घरी परतल्यावर त्याने सुनीता बोबडे यांना फोन करुन मेघाला काही तरी झाले आहे, तुम्ही लवकर या, असे म्हटले. 

दरम्यान सुनीता बोबडे ही पती व मुलांसह मेघाच्या घरी गेले असता मेघा ही पलंगावर निपचित पडून असलेली दिसून आली. तिची पाहणी केली असता तिच्या गळ्यावर खरचटल्याचे निशाण दिसून आले. त्यामुळे मेघाचा मृत्यू कशाने झाला हे समजले नसल्याने सुनीता बोबडे यांनी याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दिली. यासंदर्भात पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर नेमका मृत्यू कशाने हे माहिती पडेल, असे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस