आजारी भावास भेटायला निघालेल्या महिलेवर हॉटेलवर नेऊन दुष्कर्म
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 14, 2023 00:08 IST2023-05-14T00:08:27+5:302023-05-14T00:08:50+5:30
पीडित महिलेने फिर्याद दिली असून विकास सानप या तरुणा विरोधात गुन्हा दाखल

आजारी भावास भेटायला निघालेल्या महिलेवर हॉटेलवर नेऊन दुष्कर्म
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: आजारी भावाला भेटायला निघालेल्या महिलेला दुचाकीवर बसवून जबरदस्तीने हॉटेलवर नेऊन दुष्कर्म केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून विकास सानप या तरुणाविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिला आजारी भावाला भेटायला जात असताना संशयित आरोपी समोर आला आणि मी सोडतो म्हणत दुचाकीवर बसवून नेले. पीडितेला एका हॉटेलमध्ये नेत दुष्कर्म केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.