अंगावर शहारे आणणारी घटना, बर्थ डे पार्टीतच दिव्यांगाने चाकू भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:32 IST2023-02-03T20:32:45+5:302023-02-03T20:32:59+5:30

राजूने छेदा लालचे २ पाय पकडले आणि त्याला खाली पाडले त्यानंतर त्याच्या पोटावर सलग चाकूचे ६ वार केले.

A shocking incident, Man dies after being stabbed in UP's Shahjahanpur | अंगावर शहारे आणणारी घटना, बर्थ डे पार्टीतच दिव्यांगाने चाकू भोसकून केली हत्या

अंगावर शहारे आणणारी घटना, बर्थ डे पार्टीतच दिव्यांगाने चाकू भोसकून केली हत्या

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर इथं एक बर्थ डे पार्टी गावातील एका व्यक्तीचं मृत्यूचं कारण बनली आहे. ज्या व्यक्तीनं ही हत्या केली तो पायाने दिव्यांग आहे. या दिव्यांगाने किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्याने एकाचवेळी व्यक्तीच्या पोटावर ६ वेळा चाकूने वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेला तो व्यक्ती तिथेच खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी दिव्यांग तिथून फरार झाला. 

गावात सुरू होती बर्थ डे पार्टी
हत्येची खळबळजनक घटना शाहजहापुरच्या कटरा परिसरात घडली आहे. ज्याठिकाणी गुरुवारी रात्री गावात राहणाऱ्या राजवीरच्या मुलाचा वाढदिवस होता. घरात सगळे पाहुणे आले होते. बर्थ डे पार्टी सुरू होती. घराबाहेर मैदानात जेवणाची सोय केली होती. त्याठिकाणी राजवीरचा शेजारी छेदा लाल कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करत होते. 

त्यावेळी गावात राहणारा दिव्यांग राजू त्याची ई रिक्षा घेऊन तिथे पोहचला. त्याला तिथून जायचे होते परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्याला बळजबरीने रिक्षा काढण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे छेदा लालने काही वेळ थांबण्यास सांगितले. याच गोष्टीने संतापलेला राजूनं छेदा लालसोबत वाद घातला. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. त्यात रागाच्या भरात राजूने सलाद कापणाऱ्या वेटरकडून चाकू हिसकावून घेतला. 

राजूने छेदा लालचे २ पाय पकडले आणि त्याला खाली पाडले त्यानंतर त्याच्या पोटावर सलग चाकूचे ६ वार केले. त्याने इतक्या जोरात हे वार केले त्याने छेदालाल रक्तबंबाळ अवस्थेत पडला. अंगावर थरकाप उडवणारी घटना पाहून पार्टीत आलेल्या लोकांमध्ये गोंधळ माजला. मुलं घाबरली आणि त्याचाच फायदा घेत राजू तिथून पळाला. डॉक्टरांनी छेदा लालला मृत घोषित केला असून या संबंधात पोलीस तपास करत आहे. 

आरोपीला पोलिसांनी केली अटक
शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी राजूला बेड्या ठोकल्या. जेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. छेदा लाल आणि राजू यांच्यात यापूर्वी काही वाद झाला होता का? की राजूने रागाच्या भरात हे कृत्य केले याचा पोलीस शोध घेत आहेत. 
 

Web Title: A shocking incident, Man dies after being stabbed in UP's Shahjahanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.