मित्रांनी केला घात, बाहेर पाठवले अन् डाव साधला; रिक्षात कोंबत तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 06:25 IST2023-09-22T06:24:39+5:302023-09-22T06:25:03+5:30

या दोघांनी पीडित तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. 

A shocking incident in Dombivli where a young woman's friend was sexually assaulted by two men | मित्रांनी केला घात, बाहेर पाठवले अन् डाव साधला; रिक्षात कोंबत तरुणीवर अत्याचार

मित्रांनी केला घात, बाहेर पाठवले अन् डाव साधला; रिक्षात कोंबत तरुणीवर अत्याचार

डोंबिवली : तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली. 

या घटनेप्रकरणी बुधवारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेश गडारी (वय २२)  याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या साथीदार फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.  पीडित तरुणी मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. 
राहते घर सोडणार असल्याने तिने साहित्य तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. रविवारी रात्री पीडित तरुणी आणि तिचा मित्र तिचे साहित्य घेण्यासाठी दिनेशच्या घरी गेले होते. त्याठिकाणी दिनेशचा मित्र होता. या दोघांनी पीडित तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. 

घरी एकटीच असल्याचा फायदा उठवला
तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा उठवत दिनेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती कशीबशी घराबाहेर पळाली, तर दिनेशच्या मित्राने तिला गाठले. तिला रिक्षात कोंबत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेशला बेड्या ठोकल्या आहेत, त्याच्या मित्राला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले.

Web Title: A shocking incident in Dombivli where a young woman's friend was sexually assaulted by two men