शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:24 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ५७ वर्षीय सुदेष्णा जेना हिने तिच्या ७२ वर्षीय हरिहर साहू नावाच्या घरमालकाला त्यांची मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळले.

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून एक अक्षरशः थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या घरमालकावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ५७ वर्षीय सुदेष्णा जेना हिने तिच्या ७२ वर्षीय हरिहर साहू नावाच्या घरमालकाला त्यांची मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळले.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकाचे प्रमुख सरवन विवेक एम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधवा जेना आणि निवृत्त महसूल अधिकारी साहू यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी सकाळी साहू आपल्या खोलीत झोपलेले असताना, जेना त्यांच्या खोलीत आली आणि तिने त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जाळून टाकले. गंभीररित्या भाजलेल्या हरिहर साहू यांना बरहामपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्यांना कटक येथे रेफर केले, मात्र, साहू यांना वाचवता आले नाही, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

संबंधित पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, महिलेने केवळ तिच्या घरमालकाची नियोजनबद्ध पद्धतीने हत्याच केली नाही, तर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. तिने साहू यांचा फोन घराच्या अंगणात फेकला आणि ज्या बाटलीतून त्याच्या अंगावर रॉकेल ओतले ती बाटलीही त्याच आगीत फेकली.

एवढेच नाही तर, आग लावल्यानंतर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी साहू यांना वाचवण्याचे ढोंग करत ओरडण्यास सुरुवात केली, यानंतर, शेजारी लोकही तेथे आले. यानंतर, त्यांनी जखमी साहू यांना रुग्णालयात दाखल केले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिलेने मृताच्या मुलीला घटनेची माहिती दिली. यानंतर त्याची मुलगी मधुस्मिता कटक रुग्णालयात पोहोचली. साहू यांनी आपल्या मुलीला कुणीतरी आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितल्यानंतर कथित खून प्रकरण उघडकीस आले.

या आधारावर, मृताची मुलगी मधुस्मिताने वैद्यनाथपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने संबंधित महिलेवर, मालमत्ता हडप करण्यासाठी आपल्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. मधुस्मिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू