शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:16 IST

अनिता राजने इंदूरच्या सोनम प्रकरणाप्रमाणेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

एकीकडे राजा रघुवंशी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजलेली असतानाच, आता याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. ८ जून रोजी घडलेली ही घटना तब्बल ८ दिवसांनी उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

अलवर जिल्ह्यातील खेरली येथे वीरू जाटव नावाच्या व्यक्तीचा ८ जून रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा सामान्य मृत्यू वाटत होता, पण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वीरूची पत्नी अनिता राज आणि तिचा प्रियकर काशीराम यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजने इंदूरच्या सोनम प्रकरणाप्रमाणेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ८ जून रोजी पहाटे २ वाजता अनिता राजने आपल्या प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना घरी बोलावले. तिने घराचा दरवाजा उघडा ठेवला, ज्यामुळे मारेकऱ्यांना घरात घुसणे सोपे झाले.

गळा दाबून केली हत्या

आरोपींनी वीरूचा गळा दाबून खून केला. सकाळी अनिताने पतीची तब्येत बिघडल्याचे नाटक केले. कुटुंबीयांनी वीरूला रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवाल पाहिला, तेव्हा वीरूच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि तुटलेले दात आढळले, ज्यामुळे हत्येचा संशय बळावला.

प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काटा काढला

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असता, अनिताचे काशीरामशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

चौकशीत असेही उघड झाले की, अनिताने वीरूशी दुसरे लग्न केले होते. तिने तिच्या पहिल्या पतीला सोडून वीरूसोबत लग्न केले होते. आता, काशीरामसोबत राहण्यासाठी तिने वीरूचा खून करण्याचा कट रचला होता. वीरूने १५ दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे लग्न केले होते.

सीसीटीव्हीने उघड केले सत्य

वीरूचा मोठा भाऊ गब्बर याने वीरूच्या शरीरावर असलेल्या जखमा आणि तुटलेल्या दातांमुळे खुनाचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कठुमार सीओ कैलाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, धीरेंद्र सिंग गुर्जर यांच्या टीमने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमुळेच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी अनिता राज, तिचा प्रियकर काशीराम आणि कॉन्ट्रॅक्ट किलर विश्वेंद्र जाटव यांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानhusband and wifeपती- जोडीदार