शेतीच्या वादातून पोलीस जवानाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:27 IST2023-02-14T17:25:51+5:302023-02-14T17:27:28+5:30

शेतीच्या वादातून सिरोली (महागाव) येथे पोलीस जवानाची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतक जवानाचे नाव विलास रामदास मस्के ...

A policeman was killed in an agricultural dispute | शेतीच्या वादातून पोलीस जवानाची हत्या

शेतीच्या वादातून पोलीस जवानाची हत्या

शेतीच्या वादातून सिरोली (महागाव) येथे पोलीस जवानाची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतक जवानाचे नाव विलास रामदास मस्के (४१) असे आहे. तो नवेगावबांध पोलीस ठाण्यात सी-६० जवान असल्याचे समजते. या घटनेत मृतकाचे वडील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतक हा भाड्याने शेती करायचा. तो ज्यांची शेती भाड्याने करायचा त्यांच्याशी शेतीवरून वाद सुरू होता. वादातूनच ही हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. मृतकाची स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
 

Web Title: A policeman was killed in an agricultural dispute