शाळकरी मुलाला घ्यायला आलेल्या आईचा विनयभंग
By योगेश पांडे | Updated: August 20, 2023 16:18 IST2023-08-20T15:49:34+5:302023-08-20T16:18:26+5:30
संबंधित महिला पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहते. तिचा मुलगा दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास शाळेतून व्हॅनमधून परत येतो.

शाळकरी मुलाला घ्यायला आलेल्या आईचा विनयभंग
नागपूर : आपल्या मुलाला शाळेच्या व्हॅनमधून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. भर दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संबंधित महिला पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहते. तिचा मुलगा दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास शाळेतून व्हॅनमधून परत येतो. त्याला घेण्यासाठी घराजवळील मुख्य रस्त्यावर जावे लागते. दररोजप्रमाणे महिला रस्त्याच्या कडेला उभी असताना विनोद अशोक कोहाळ (३७, पारडी) हा तेथे आला व त्याने घाणेरडे उशारे करत महिलेशी अश्लिल चाळे केले. त्याने विनयभंग केल्याने महिला घाबरली व तिने आरडाओरड केली.
त्यामुळे तेथे परिसरातील लोक जमा झाले. लोक येत असल्याचे पाहून आरोपी विनोद पळून गेला. महिलेने पारडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.