शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 08:36 IST

सहा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावात १३ वर्षीय मुलावर गेल्या पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी ६ अल्पवयीन मुलांवर वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बालसुधारगृहात पाठविले आहे. 

पीडिताच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलाच्या काकाला व्हॉट्सॲपवर एक व्हिडीओ मिळाला, ज्यामध्ये एका मुलावर हल्ला केला जात होता आणि पार्श्वभूमीच्या आवाजात इतर मुले हसत होती. हा व्हिडीओ पाहिल्यावर काकांकडून पीडिताला त्याबद्दल विचारल्यावर त्याने घडला प्रकार सांगितला, असे पोलीस म्हणाले. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडिताने उघड केले; परंतु त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांसह कोणालाही याबाबत सांगण्यास तो घाबरत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपी हे १५ ते १७ वयोगटातील असून ते केवळ मुलावर हल्ला करत नाही, तर गुन्हेगारी कृत्याचे चित्रीकरणदेखील करताना दिसत आहे. 

व्हिडीओ फिरवले सोशल मीडियावर पोलिसांनी सांगितले की, पीडितावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आले. ज्यात आरोपीच्या घराचा देखील समावेश आहे. ‘आरोपींनी या कृत्याचे परिणाम समजून न घेता ते व्हिडीओ व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मजेसाठी’ फिरवले होते. पीडिताच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर, सर्व मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ते सध्या डोंगरी येथील बाल बंदी केंद्रात आहेत. पोलिसांनी आरोपींकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी