अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
By भगवान वानखेडे | Updated: September 23, 2022 16:53 IST2022-09-23T16:53:28+5:302022-09-23T16:53:57+5:30
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली की, त्यांची मुलगी १२ व्या वर्गात शिकत असून, तिची मेहकर येथील शिवा गिरी या युवकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती.

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
बुलढाणा : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीस मेहकरमधील युवकाने फूस लावून पळवले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध २२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली की, त्यांची मुलगी १२ व्या वर्गात शिकत असून, तिची मेहकर येथील शिवा गिरी या युवकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. अशातच १५ दिवसांपूर्वी मला फोन करून त्या युवकाने ‘मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे’ म्हणून म्हटले होते.
यानंतर मुलीलाही समजावून सांगितले होते. मात्र, २१ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून मुलगी घरातून बेपत्ता असल्याने शिवा गिरी यानेच अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी शिवा गिरी या युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.