धक्कादायक! बोर, मध देण्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By प्रदीप भाकरे | Updated: December 18, 2022 13:18 IST2022-12-18T13:17:53+5:302022-12-18T13:18:18+5:30
रहिमापुर शिवारातील घटना, आरोपीला तातडीने घातल्या बेडया

धक्कादायक! बोर, मध देण्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अमरावती: बोर आणि मध देण्याची बतावणी करून एका १२ वर्षे सहा महिने वयाच्या बालिकेवर जबरीने बलात्कार करण्यात आला. रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हददीतील एका शेतशिवारात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी आरोपी बबलू उर्फ मिलिंद एकनाथ हरणे (४४, रा. हिंगणी गावंडगाव) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी, ॲट्रासिटी व पास्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक ६५ वर्षीय वृध्दा ही तिच्या १२ वर्षे सहा महिने वयाच्या नातीसह १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास स्वत:च्या शेतात तुरीच्या शेंगा तोडण्याकरीता गेली होती. वृध्देची नात बोरे तोडण्याकरीता शेताच्या दुस-या धु-यावर गेली. काही वेळाने तिला नातीच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला. तिने तातडीने शेताचा दुसरा धुरा गाठला. त्यावेळी तिची नात जमीनीवर कोसळलेल्या स्थितीत आढळून आली. तिच्या आजीने तिला धीर देत विश्वासात घेऊन विचारले असता, बलात्काराची घटना उघड झाली. तिच्या कथनानुसार, आरोपीने तिला बोर व शहद देण्याची बतावणी केली. तथा बाजुच्या शेतात नेले. तिच्यावर बलात्कार केला. तिला विहीरीत टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी रात्री ११.१८ च्या सुमारास आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर प्रकरणाचा तपास एसडीपीओ अतुल नवघरे हे करीत आहेत.
पिडित बालिकेच्या आजीच्या तक्रारीवरून आरोपी बबलूविरूध्द बलात्कार, ॲट्रासिटी व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक केली. तिला मध व बोर देण्याची बतावणी करण्यात आली. - सचीन इंगळे, ठाणेदार, रहिमापूर