लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची पोलीस ठाण्यात धाव

By दिपक दुपारगुडे | Published: July 10, 2024 07:16 PM2024-07-10T19:16:19+5:302024-07-10T19:16:37+5:30

फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील फिर्यादी अल्पवयीन आहे. याबद्दल नमूद आरोपीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी गोडीगुलाबीने वागून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

A minor girl was raped by luring her into marriage, the victim ran to the police station | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची पोलीस ठाण्यात धाव

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची पोलीस ठाण्यात धाव

सोलापूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी गोडीगुलाबीने लॉजवर नेऊन जबरदस्तीने अश्लील कृत्य केल्याची तक्रार पीडितेने जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. बुधवारी (१० जुलै) आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अन्वये गुन्हा नोंदला आहे. सागर सोमण्णा कुंभार (रा. हत्तूर, ता. द. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील फिर्यादी अल्पवयीन आहे. याबद्दल नमूद आरोपीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी गोडीगुलाबीने वागून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान त्याने तुळजापूर हायवेवरील एका लाॅजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून अश्लील कृत्याची मागणी केली. पीडितेचे या कृत्यास विरोध केला. मात्र आरोपीने तुझे लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर घरी घेऊन मागणी घालेन अशी समजूत घालून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला फौजदार शेख करीत आहेत.

Web Title: A minor girl was raped by luring her into marriage, the victim ran to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.