लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला मुलीला जन्म
By रूपेश हेळवे | Updated: March 28, 2023 17:01 IST2023-03-28T17:01:07+5:302023-03-28T17:01:37+5:30
एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता साऱ्यांना समजले.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला मुलीला जन्म
सोलापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दीड वर्षांपासून अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी नईम शेख (रा. सोलापूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार अपराधापासून संवक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे.
आरोपी नईम याने पीडितेशी जवळीकता वाढवली. त्यानंतर तिला घरात कोणी नसताना घरी बोलवून मागील दीड वर्षांपासून अनेक वेळा अत्याचार केला. काही दिवसानंतर पीडिता ही गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने आपल्या आई वडिलांना सांगितली नाही. एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नुकतेच पीडितेने मुलीला जन्म दिला आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.